उचलेगीरीस सक्त मनाई

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Tuesday, November 27, 2012

विवाह लवकर जमावा म्हणून उपाय : कट्यायनी देवीचे व्रत आणि इतर

A. अनुरूप, मनासारखा वर मिळावा म्हणून मुलीने करावयाचे उपाय :

  1. Om hareeng kumaraye namah sawaha  हा जप १ लाख २५ हजार वेळा करणे.
  2.
“Hey gauri shankaradhan yatha twam shankarpriya
Tatha man kuru kalyani kantkantan sudurlabham”

 रोज ५ माळा जप सलग २१ दिवस करणे .
  3.
“Om katyayani mahabhage mahayoginy adhishvarim
Nand gop sutam devi patiam me kurute namah”

एकांत आणि शांत जागी मुलीने पश्चिमेस  तोंड करून ५ माळा  रोज जपाव्यात. सकाळी सकाळी करावे. सलग ४१ दिवसांनी शुक्ल पक्षातील सोमवारी किवा शुक्रवारी ९ माता पार्वतीची पूजा करून ; लहान मुलींना आणि ३ लहान मुलांना भोजन आणि मुलींना ओढणी / रुमाल व मुलांना काहीतरी कापड दान करावे. ब्राह्मणास  यथेच्य दान करावे.

4. कट्यायनी देवीचे व्रत : ( १६ डिसेम्बर-१४ जानेवारी २०१२ )
कट्यायनी व्रत हे देवी रुक्मिणीने श्रीकृष्णाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते , असा पुराणात उल्लेख आहे.
संदर्भ: भागवत पुराण , देवी महात्म्य, तैत्रेय्य अरण्यका, कृष्ण याजुर्वेदाचा काही भाग आणि स्कंद पुराणात हे व्रत अत्यंत पवित्र आणि फलदायी सांगितले आहे.

  -------------------
साहित्य : कट्यायनी देवीचा फोटो , षोडशोपचारे पूजा करण्यास लागते ते नेहमीचे साहित्य ( हळद - कुंकू -उदबत्ती-फुले-पान-सुपारी -पंचामृत -प्रसाद  वगरे ) , लाल रंगाचा पोशाख पूजा करतानाचे वेळीस. तांबडे वस्त्र, मंगळसूत्र .  कट्यायनी व्रताच्या कहाणीचे पुस्तक ( धार्मिक पुस्तकांच्या दुकानात सहज मिळते .) 
कधी करावे: सलग ७ मंगळवार करावे. दक्षिण भारतात हे व्रत धनू मासात करितात. सौर कॅलेंडर नुसार मार्गशीर्ष महिना धनू मास समजला जातो . २०११-२०१२ मध्ये हे व्रत १६ डिसेम्बर ला चालू होईल ; आणि १४ जानेवारीला समाप्ती असेल.
पूजेचे विधी : . पहाटे / सकाळी आंघोळ झाल्यानंतर लाल / तांबडे पोशाख घालून देवीचा फोटो देवात / पवित्र ठिकाणी ठेऊन षोडशोपचारे पूजा करावी. नंतर कहाणी / स्तोत्राचे  करावे. नैवेद्य दाखवावा. मनोभावे पूजा करावी. कुलदेवता, आद्य देवतांचे स्मरण करावे. दिवसभर उपास करावा. रात्री दुध्फ्लाहार करावा.
उद्यापन : ८ व्या मंगळवारी ७ सुवासिनींना बोलावून त्यांना प्रसाद, गोडधोड , लाल खण द्यावा.



5. गंधर्व साधना : गंधर्व हे प्रेम, सौंदर्य , विवाह याचे दैवत मानले जाते.
कोणी करावी :
विव्हेछुक मुलींनी, प्रेम प्रकरणात अडथळे असणार्या मुलींनी, घरातील मंडळींनी घरातील मुलीच्या विवाहासाठी मुलीच्या वतीने केल्यास चालेल. ( केवळ स्त्रियांसाठी . पुरुषांनी करावे कि नाही याचा खुलासा नाही. तरी मुलांनी चांगली बायको मिळण्यासाठी हे करू नये  !!!!! :) )
कधी करावी:  रात्री .
कशी करावी: एका सोमवारी सुरु करून पौर्णिमेच्या दिवसापर्यंत करावी. रात्रीचे वेळी स्नान करून लाकडी आसनावर पिवळे वस्त्र टाकून त्यावर बसावे. खालील मंत्र १० वेळा म्हणावा.

|| Om Kleem Vishvaasu Naam Gandharvah Kanyaah Naamaadhipatih Labhaami Dev-dattaam Kanyaam Suroopaam Salaankaaraam Tasmei Vishvaav-sarva Namah ||


रोज एक वेळा याप्रमाणे सोमवार ते पौर्णिमेपर्यंत आवर्तने वाढवावीत. पौर्णिमेचे दिवशी याच जपाची पाच अधिक आवर्तने करून सिध्द झालेला ताईत मुलीच्या दंडाला 
बांधावा. सिध्द यंत्र देवघरात ठेऊन याची पूजा करावी.

वि . सु.
१. सर्व उपाय आपल्या गुरुजींना / घरातील वडीलधार्यांना विचारून करावेत.
२. कट्यायनी व्रत आपण महाराष्ट्रीयन लोक हरितालिका करतो त्याप्रमाणे आहे. तरी देखील विचारून केलेलच बरे.
३. गंधर्व व्रत - विवाह झाल्या नंतर ताईत / यंत्र  विसर्जन करावे की तसेच ठेवावे याचा मला संदर्भ मिळालेला नाही. तरी संपूर्ण माहिती शिवाय अर्धवट काहीतरी करू नये.
काही माहिती मिळाल्यास अवश्य कॉमेंट करणे. बाकी इच्छुकांना झाला तर फायदाच होईल . मॉडरेशन नंतर अशा कॉमेंट नक्कीच पब्लिश केल्या जातील. 

No comments:

Post a Comment

Your Queries / Suggestions most welcome!