उचलेगीरीस सक्त मनाई

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई
Showing posts with label Patrika matching. Show all posts
Showing posts with label Patrika matching. Show all posts

Tuesday, March 26, 2013

मंगळ दोष , पत्रिका मिलन ( Manglik Dosha , Patrika matching ) : updates- with remedy

मंगळ दोष , पत्रिका मिलन :

अनेक केसेस मध्ये मंगळ दोषाविषयी  लोकांना चुकीचे मार्गदर्शन मिळालेले दिसते . म्हणूनच याविषयी वधू - वरांच्या पालकांसाठी उपयुक्त अशी माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे.


असो, तरी केवळ लोकांच्या हितासाठी काही माहिती देत आहे.

१. मंगळाच्या स्थानी गुरु , शनि , केतू यांसारखे ग्रह असता मंगळ दोष नाहीसा होतो.
२. काही स्थानातील मंगळ  हा पतीच्या सुखासाठी , उत्कर्षासाठी , जातकाच्या धडाडीने काम करण्यासाठी कारणीभूत होतो. या कलियुगात जगताना असा मंगळ हवाच !!
३. केवळ मुलाला / मुलीला मंगळ आहे म्हणून स्थळे नाकारताना आधी स्वतःच्या अपत्याची पत्रिका नीट बघावी . हा मंगळ आणि अपत्याच्या पत्रिकेतील टेक्निकल / सर्जन लाइफ पार्टनर किवा अशा काही गोष्टींचा द्योतक असू शकतो.
४. प्रत्येक पालकाने  : दाते पंचांग २०१३ , पान ११ यावरील मंगळ दोषावरील उतारा अवश्य वाचवा.
५. आताच ३१ गुण जमून देखील ६ महिन्यात घटस्फोट झाल्याची केस आली. कृपा करून केवळ गुण मिलन हा निकष लाऊन २ आयुष्यांशी खेळू नये. मूळ पत्रिकेत वैवाहिक सौख्य कसे आहे , विवाहाचे सप्तम स्थान पाप कार्त्रीत आहे का , वैवाहिक सौख्याचे कारक ग्रह कसे आहेत , आपल्या अपत्याच्या मूळ पत्रिकेत या गोष्टी कशा आहेत , काही दोष जरी असले तरी कोणताच माणूस परिपूर्ण नसतो हे ध्यानी घ्यावे. आपल्या अपेक्षा आणि मूळ पत्रिकेतील तसे ग्रह आहेत का , याचा सारासार विचार करावा. ( उदा. डॉक्टर बायकोसाठी ३५ वर्षे थांबूनही उपयोग होणार नाही , जर पत्रिकेत डॉक्टर बायकोचे योगच नसतील  ! )
६. वाईट योग, दुषित स्थाने शुभ ग्रहांच्या दृष्टीने / नवपंचम वगरे योगांनी दोषमुक्त होत आहेत का ; याचा अभ्यासू ज्योतिषांकडून सल्ला घ्यावा.