शनी महाराज : धनु राशीत ४ वर्षे मुक्कामास !
या लेखात २०१७ च्या धनु राशीत जाणाऱ्या शनीची राशीनुसार मिळणारी फळे लिहीत आहे. वक्री होऊन मागील स्थानात येणारा शनी आपल्या लीला दाखवेलच. मात्र साधारणपणे धनु राशीतील शनी आणि त्याची फळे लिहिली आहेत.
सर्वसाधारण मोघम सार :
वृश्चिकेतील शनी पेक्षा धनु राशीतील शनी साऱ्यांनाच सुटकेचा निश्वास आहे ! धनु राशीतील शनी केतू , शुक्र आणि रवीच्या नक्षत्रांतून भ्रमण करेल. मूळ नक्षत्रातील केतूच्या अंमलात असणारे शनीचे भ्रमण काहीसे कुरकुरे जाईल. २६ जानेवारी २०१७ ते २ मार्च २०१८ या काळात हे भ्रमण असेल.( २ मार्च २०१८ नंतरचा पुढचा काळ साधारण साऱ्यांना परिस्थितीत सुदाहरणा दिसण्याचा !)इथेच २१ जून २०१७ ते २६ ऑकटोबर २०१७ ह्या ५ महिन्यात शनी वक्री होऊन पुन्हा वृश्चिकेचा डंख मारून इंगा दाखवणार आहे. शनी महाराज चौकार -षटकार मारीत तब्बल ४ वर्षे (सरळ / वक्री वगरे ) धनु राशीत मुक्कामास आहेत. २५ जानेवारी २०२० रोजी महापर्वणी च जणू , की वैश्विक ऊर्जेच्या जगातील हे महान खेळाडू अखेरीस आपल्या स्वतःच्या " मकर " राशीत प्रवेश करतील.शनिमहाराजांची ४ वर्षे प्रवासगाथा :
२६ जानेवारी २०१७ : वृश्चिकेतून धनु राशीत
७ एप्रिल २०१७ : धनु राशीत वक्री
२१ जून २०१७ : वक्री शनी वृश्चिकेत दाखल ! हल्लाबोल !
२७ ऑकटोबर २०१७: वृश्चिकेतून धनु राशीत पुन्हा आगमन
१९ एप्रिल २०१८ : धनु राशीत वक्री
६ सप्टेंबर २०१८ : धनु राशीत सरळ ( मार्गी )
१ मे २०१९: धनु राशीत वक्री
१९ सप्टेंबर २०१९ : धनु राशीत सरळ (मार्गी )
२५ जानेवरी २०२० : मकर राशीत प्रवेश ! ( साष्टांग धप्प !!! मकरेत - झेंडा रोविला !!! हुश्शह्ह !!!)
२६ जानेवारी २०१७ ते २ मार्च २०१८ : मूळ नक्षत्रात भ्रमण
२ मार्च २०१८ ते २७ डिसेम्बर २०१९ : पूर्वाषाढा नक्षत्रात भ्रमण
विशेष राशी :
अष्टम शनी : वृषभ राशीस धनु राशीतील शनी अष्टम असेल.कंटक शनी : ४, ७, १० वा शनी मिथुन , कन्या , मीन राशीस असेल. (केंद्रातून शनी चे भ्रमण कंटक शनी म्हणले जाते.)
चंद्र रास आणि जन्म -लग्न रास अशा दोन्ही पद्धतीने फळे मिळतात च ! तरी , यातून कोणीच तसे म्हणले तर सुटत नाही. कोणाला साडेसाती , कोणाला मिनी साडेसाती , कोणाला शनी ची महादशा / अंतर्दशा , कोणाला ६, ८, १२ वा शनी , कोणाला केंद्रातील शनी ! तरी , अखिल जगतहो सावधान !
याला म्हणतात " दैवाचा फेरा "
तुमची या जन्मीची / गत जन्मीची पुण्याई ठरवेल तुम्हाला - " मार दिया जाये की छोड दिया जाये" आणि मग गुरु महाराज आणि सर्व ग्रह एकत्रित शनी महाराजांबरोबर ठरवतील - " तेरे साथ क्या सुलूक किया जाये ! " आणि शनी महाराज म्हणतात " जो डर गया , वो समझो मर गया ! "
वक्री शनी ग्रह आणि परिणाम :
वक्री ग्रह म्हणजे नक्की काय आहे? पृथ्वी पासून दिसणारा एक ग्रह मागे येण्याच्या दिशेने अल्याचे दिसते तेव्हा ग्रह वक्री झाल्याचे म्हणले जाते. हा लेख आपणास वक्री शनीविषयक व त्याचे इतर परिणाम समजण्यास मदत व्हावी याकरिता लिहिला आहे. घाबरून न जाता जमल्यास समजून घ्यावे , मिळालेल्या सूचनांच्या आधारे काळजी घ्यावी. संतांचे , सद्गुरुंचे व कुलदैवताचे ध्यान करावे. सत्कर्म करावे. म्हणजे कर्मांचा द्योतक असणारा शनी आपल्याला देणारी फळे पचविण्यास परमेश्वर कृपेने आपल्यास बळ मिळेल. ज्योतिषाच्या आहारी न जाणाऱ्यांनी इतकेच गाठीशी बांधावे की शनी -गुरु सारख्या महाबलिष्ट ग्रहांच्या भ्रमणाने जीवनात घडणाऱ्या मोठाल्या घटना घडतात. तुमच्या वैयक्तिकच नव्हे तर अखिल जगातील महत्वाच्या घडामोडी अशा मोठाल्या ग्रहबदलांमुळे घडतात. डोळस पणे लक्ष ठेऊन बघण्यास तर काही हरकत नाही !
वक्री शनी झालेल्या चुका सुधारून पुन्हा एकदा सारे काही नव्याने घडवण्यासाठी संधी देत असतो. मात्र या वेळेत कोणत्याही व्यवसाय विषयक घडामोडी न करणेच अधिक श्रेयस्कर ठरते. वक्री शनी दोन्ही चांगले आणि वाईट परिणाम देतो. आपण करीत असलेल्या कामासंदर्भात आपल्यास नवीन कल्पना भरपूर मिळतील आणि आपल्या भावी योजना मदत होईल. तो सध्या सुरू असलेल्या गोष्टी , अडचणी हाताळताना आणि एकाच वेळी नवीन गोष्टी सुरू करण्यासाठी आवश्यक पायंडा घालण्याचे दुहेरी काम करितो . अर्थातच मनुष्याला स्वतंत्र सक्षम करतो.
जन्मपत्रिकेत वक्री शनी :
शनी जन्म पत्रिकेतच मुळात वक्री असणाऱ्या व्यक्ती इतरांवर कमी विश्वास ठवणाऱ्या , संशयास्पद आणि भविष्यात इतरांवर अवलंबून राहणाऱ्या असतात. ही एक अशी व्यक्तीनां नातेवाईक, विशेषत: भावंड यांच्याशी वैर , वाद यांचा सामना करावा लागेल अशी शक्यता असते . तथापि, ते फार धर्मिक असतात. ही परिस्थिती , घटना , वयक्ती अधिक गंभीरपणे पाहण्याची क्षमता देते." शिस्त , व्याव्हारिकपणा , सातत्याने करावयाचे काम , माणसांचे खरे रूप कळल्यावर पचवावयाचे धक्के , गेल्या अनेक जन्मांतील -या जन्मातील कर्मांची भोगव्याची फळे (चांगली / वाईट ) , एकला -चलो -रे साठी मनाची खम्बिर तयारी अशा महत्वाच्या आणि आयुष्याच्या पुढील प्रवासात उपयोगी येतील अशा शिक्षणाची पुरचुंडी म्हणजे शनी च्या विविध भ्रमणात घडणाऱ्या ठळक घडामोडी. "
मेष रास / मेष लग्न
९ वा शनी . ३, ६, ११ वर दृष्टी . नातेवाईक , भावंडे , नाती -संबंध यांमध्ये कटू अनुभव येतील. घाबरू नका. माणसांचे खरे रूप जाणून भविष्यात सावधगिरी बाळगा. आठवा शनी हल्ल्याने परिस्थिती सुधारणारच आहे. हुश्श ! म्हणणारी तुमची एक रास नक्की !वृषभ रास / वृषभ लग्न
८ वा शनी. शुक्राच्या नक्षत्रातून शनी चे भ्रमण. एकंदरीत मौज -मजा , छान -छोकी कडे नियंत्रण ठेवल्यास उत्तम ! अथवा तब्बेतीच्या तक्रारी सतावतील. घाबरू नका , काळजी घ्या.मिथुन रास / मिथुन लग्न
७ वा शनी , जोडीदाराकडून सुख ही देईल. शनी हा विलासी ग्रह आहे , हे विसरू नका. अति -राजवैभव भोगणाऱ्यांचा शनी बलवान असतो. मात्र मार्च २०१८ पर्यंत जोडीदाराकडून कचकच चालूच राहील. केतुचे नक्षत्र भुक्त झाल्यावर मात्र जोडीदाराबरोबर मौज मजेचे गोड दिवस अनुभवायास मिळतील. शनी चे शुक्राच्या नक्षत्रातील भ्रमण साधारणपणे साऱ्यांनाच सुखदायक ठरेल. सर्व राशींना ! सप्तम स्थान विवाह , व्यवसाय भागीदाराचे असल्याने मनमोहक, रसाळ फळे चाखावयास मिळणार आहेत ! धीर धरा हो , धीरापोटी फळे रसाळ गोमटी !!!कर्क रास / कर्क लग्न
जरा कुरकूरी , अडथळे असे काही चालू राहील. डोकं शांत ठेवा, लक्ष केंद्रित करा. स्वतःला अति अपेक्षांमध्ये ताणू नका. आनंद आणि कम्फर्ट कडे तुमचे लक्ष राहील. चुळबुळेपणा आणि हळवेपणा कमी केलात तर गाडी रुळावर येईल.सिंह रास / सिंह लग्न
शिक्षण , प्रेम प्रसंगात कभी हा -कभी ना चालेल. चिंता नसावी. अधिक लक्ष केंद्रित करून , चिकाटी आणि सातत्याची परीक्षा पास व्हा ! मग सारे चांगले घडेलच. अडथळ्यांच्या शर्यतीत जिंकायचे लक्ष समोर ठेवा.कन्या रास / कन्या लग्न
घरात सासू -सुनांच्या मालिका लागल्याप्रमाणे धुसफूस चालेल. डोकं गहाण न टाकता वातावरण हलके फुलके ठेवण्याचा प्रयत्न करा. मार्च नंतर जरा जास्तच आनंदच्या भरात उधळपट्टी नको . कन्येच्या हातून पैसे सुटणे कठीणच ! तरी, उधळपट्टी कटाक्षाने टाळा. अनपेक्षित खर्च उदभवतात. त्याचे पूर्वनियोजन आत्तापासून करून ठेवा.तूळ रास / तूळ लग्न
भावंडांशी भांडू नका. वाद वाढवू नका. कदाचित बहीण -भाऊ शिक्षण / नोकरीस्तव तुमच्यापासून दूरदेशी जातील. काही काळ समजून घ्या, पडते घ्या , त्यांच्या आनंदात तुमचा आनंद माना. प्रवासात काळजी घ्या.वृश्चिक रास / वृश्चिक लग्न
" अति हाव - मसणात जाव " लक्षात असू द्या. लग्नाची साडेसाती / राशीची साडेसाती सौम्य होईल. वृश्चिकेतला शनी धनु राशीत जात आहे. मात्र जपून रहा. अति -हव्यासापासून जपा. कोणाच्याही अति -आहारी जाऊ नका. माणसे पैशासाठी / अन्य कारणासाठी तुम्हाला वापरतात / फसवितात इत्यादी स्वरूपचा अनुभव संभवितो. जेणेकरून, दिसते तसे नसते याचा प्रत्यय येऊन माणसांचे खरे रूप समजेल. रागाने स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. अनुभव गाठीशी बांधून भविष्याचे सोने करा ! इतके साधे - सोपे आहे ! मार्च २०१८ नंतर आनंदाच्या भरात आपण पैशाचा विचार न करता मौज -मजा अनुभवाल असे दिसते !धनु रास / धनु लग्न
अति चिंता खड्यात घालेल. कौटुंबिक विषयांना तोंड फुटेल. मेडिटेशन करा. स्वतःला व्यग्र ठेवा. अति कष्ट कष्ट टाळा. मार्च २०१८ नंतर मौज - मजेचे वातावरण अनुभवायास मिळेल.मकर रास / मकर लग्न
कोर्ट कचेऱ्या , अचानक खर्च संभाविते. कटकटी वाढतील. जास्त एककल्ली होऊ नका. छोट्या छोट्या गोष्टींमधून मनाविरुद्ध घटना / नुकसान संभाविते.तुमच्या १२ व्या शनी भ्रमणामुळे तुमच्या दशा -अंतर्दशा बघून अधिक सूचक मार्गदर्शन मिळविता येईल. जसे की तुम्ही १२ व्या स्थानाचे अधिपती , व्ययेशाच्या दशा -अंतर्दशेत असाल तर तयासम्बधी तीव्र फळे मिळतील.
कुंभ रास / कुंभ लग्न
सकारात्मक रहा , एकाग्रतेने काम करीत रहा. अनुकूल गुरु भ्रमणाच्या वेळी उत्तम यश मिळेल. घराण्यातील अनुवौशिक मालमत्ता , इतर चैनीच्या गोष्टींचे विषयी खर्च / कुरकुर संभवते.मीन रास / मीन लग्न
मोठ्या उद्योगातून , दीर्घकालीन उद्योगातून / प्रोजेक्ट्समधून लाभ लाभ समभवितो. तीव्र इच्छाशक्ती आणि सकारात्मकतेने काम करा. मार्च नंतर कामातून मौजमजेसाठी छान आगळा - वेगळा ब्रेक घ्याल. तुमच्यातला रसिक काहीसा जागा होईल !यशस्वी आयुष्याच्या ६ किल्ल्या :
१. प्रामाणिक , सातत्याने प्रयत्न करत रहा.
२. सकारात्मक विचार करा.
३. नामस्मरण करा.
४. मारुतीचे दर्शन / स्तोत्र शनिवारी अवश्य म्हणा.
५. मौसाहार -मदिरा -परस्त्री- लबाडी करण्यापासून स्वतःला लांब ठेवा.
६. अनुभवाचे धडे विसरू नका.
नवं वर्षाच्या साऱ्यांना शुभेच्या !
- डॉ. केतकी इतराज
(२१ जून २०१७ ते २६ ऑकटोबर २०१७ ह्या ५ महिन्यात शनी वक्री होऊन पुन्हा वृश्चिकेचा डंख मारून इंगा दाखवणार आहे.) ही ऐवढी अचुक दिनांक तुम्ही कशी काढली? ह्या दिवसांनी माझ्या जिवना मध्ये उलता पालथ करून टाकली .ते दिवस कधी वाटले नव्हते येतिल म्हणुन.
ReplyDelete