उचलेगीरीस सक्त मनाई

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई
Showing posts with label ayurwedic. Show all posts
Showing posts with label ayurwedic. Show all posts

Thursday, February 2, 2017

Top 4 Jyotish, Vaastu, Herbal Remedies for Health

Top 4 Jyotish, Vaastu, Herbal Remedies for Health

सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग्भवेत्

आरोग्य हीच खरी सम्पत्ती आहे . वाढते प्रदूषण, वारंवर उदभवणाऱ्या नवनव्या आजाराच्या समस्या  आजकाल नेहमीच्या झाल्या आहेत. आहार , मेडिकल विषयक आणि ज्योतिष विषयक अनेक लेख मी लिहिले. यावेळी काही वेगळे आणि साऱ्यांना सहज उपयोग करून घेता येईल अशा काही गोष्टी लिहिण्याचा हा झकास प्रयत्न ! आपली भारतीय सौस्कृती अत्यंत सखोल , शास्त्रोक्त आणि तितकीच भावपूर्ण ही आहे. परंपरागत चालत आलेल्या अनेक शास्त्रांमध्ये अनेक उपयुक्त टिप्स आपल्याला मिळतात. आयुर्वेद , ऍलोपॅथी , आहारशास्त्र , होमिओपॅथी , युनानी , नॅचरोपॅथी इत्यादी प्रस्थापित आणि पारंपरिक शास्त्रांप्रमाणेच ज्योतिष , वनस्पतीशास्त्र , फेंगशुई , वास्तू काही इत्यादी अनेक गूढशास्त्राच्या ब्रांचेस आपल्याला उपयुक्त अशा अनेक गोष्टी आपल्या पोटात दडवून आहेत.री , या लेखांतून आरोग्यासाठी काही कॉम्बो-उपयुक्त टिप्स देण्याचा प्रयत्न! थोतांडांपासून सावध राहून आपल्या विचारात -आचारात काही चांगल्या गोष्टी आणाव्यात आणि त्याला तज्ञ वैद्यकीय सल्ल्याची वेळप्रसंगी जोड असावी हे महत्वाचे. अंधानुकरण करून एखाद्या शात्राचा फोलपणा ठरविण्यापेक्षा सत्यातले काही चांगले घेता आले , तर  त्याने आपले आरोग्य अधिक श्रेयस्कर , निरोगी आणि आनंदी व्हावे यासाठीच हा  प्रयत्न ! वैद्यकीय उपायांना हा पर्याय नाही ! मात्र अनेकदा निरोगी राहणे , रोगप्रतिकारक शक्ती वाढणे , औषधांचा गूण सत्वर येणे , मन आनंदी राहणे अशा प्रकारे लवकर बरे होण्यास या  उपायांचा निश्चित उपयोग होतो . तरी , वेळप्रसंगी वैद्यकीय सल्ल्याची आणि ह्या उपायांची सांगड घातली तर उत्तमच !

आवडल्यास , उपयुक्त ठरल्यास चोखंदळ वाचकांनी जरूर कळविणे !

. बिल्ववृक्ष आणि आरोग्य :

भारतीय संस्कृतीत बेल किंवा बिल्ववृक्षाला फार महत्व आहे. प्रत्येक शुभकार्याच्या प्रसंगी पूजनात बिल्व पत्रांचा उपयोग केला जातो. वैज्ञानिक दृष्टीकोन लक्षात घेऊनच ही परंपरा सुरु करण्यात आली. बिल्वपत्र शिवलिंगावर वाहतांना बोटांच्या आणि तळहाताच्या पृष्टभागावर, विषाणूंना मारक तत्व आणि सुगंध पसरला जातो. वेळोवेळी अंगाला स्पर्श करण्यामुळे शरीरावर आक्रमण करणारे विषाणू मरण पावतात तसेच बिल्व सुगंधाने पळून जातात. शेकडो रोगांना नष्ट करण्याची क्षमता असणाऱ्या ह्या दिव्य वृक्षाची प्रजाती नष्ट होऊ नये म्हणून, त्याला पुजेतही स्थान देऊन त्याचे अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न प्राचीन काळापासून केला गेला. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील दाह कमी करण्यासाठी त्रिम शरबत वापरणाऱ्या फारच कमी लोकांना माहित आहे कि, बेलापासू बनलेले शरबत सर्व दृष्टीने उपकारक आहे.