उचलेगीरीस सक्त मनाई

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Tuesday, March 26, 2013

मंगळ दोष , पत्रिका मिलन ( Manglik Dosha , Patrika matching )

मंगळ दोष , पत्रिका मिलन :

अनेक केसेस मध्ये मंगळ दोषाविषयी  लोकांना चुकीचे मार्गदर्शन मिळालेले दिसते . म्हणूनच याविषयी वधू - वरांच्या पालकांसाठी उपयुक्त अशी माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे.


असो, तरी केवळ लोकांच्या हितासाठी काही माहिती देत आहे.

१. मंगळाच्या स्थानी गुरु , शनि , केतू यांसारखे ग्रह असता मंगळ दोष नाहीसा होतो.
२. काही स्थानातील मंगळ  हा पतीच्या सुखासाठी , उत्कर्षासाठी , जातकाच्या धडाडीने काम करण्यासाठी कारणीभूत होतो. या कलियुगात जगताना असा मंगळ हवाच !!
३. केवळ मुलाला / मुलीला मंगळ आहे म्हणून स्थळे नाकारताना आधी स्वतःच्या अपत्याची पत्रिका नीट बघावी . हा मंगळ आणि अपत्याच्या पत्रिकेतील टेक्निकल / सर्जन लाइफ पार्टनर किवा अशा काही गोष्टींचा द्योतक असू शकतो.
४. प्रत्येक पालकाने  : दाते पंचांग २०१३ , पान ११ यावरील मंगळ दोषावरील उतारा अवश्य वाचवा.
५. आताच ३१ गुण जमून देखील ६ महिन्यात घटस्फोट झाल्याची केस आली. कृपा करून केवळ गुण मिलन हा निकष लाऊन २ आयुष्यांशी खेळू नये. मूळ पत्रिकेत वैवाहिक सौख्य कसे आहे , विवाहाचे सप्तम स्थान पाप कार्त्रीत आहे का , वैवाहिक सौख्याचे कारक ग्रह कसे आहेत , आपल्या अपत्याच्या मूळ पत्रिकेत या गोष्टी कशा आहेत , काही दोष जरी असले तरी कोणताच माणूस परिपूर्ण नसतो हे ध्यानी घ्यावे. आपल्या अपेक्षा आणि मूळ पत्रिकेतील तसे ग्रह आहेत का , याचा सारासार विचार करावा. ( उदा. डॉक्टर बायकोसाठी ३५ वर्षे थांबूनही उपयोग होणार नाही , जर पत्रिकेत डॉक्टर बायकोचे योगच नसतील  ! )
६. वाईट योग, दुषित स्थाने शुभ ग्रहांच्या दृष्टीने / नवपंचम वगरे योगांनी दोषमुक्त होत आहेत का ; याचा अभ्यासू ज्योतिषांकडून सल्ला घ्यावा.

Monday, March 4, 2013

Gochar - Planets 2013

गुरु -
३ मे २०१३ पर्यंत वृषभेत नंतर ३१ मे २-१३ रोजी  मिथुनेत
( ४ ऑक्टोबर २०१२ ते २९ जानेवारी २०१३ पर्यंत  वक्री )

मंगळ -
जाने.  २५ - कुंभेत
मार्च ४ - मीनेत
एप्रिल १२ - मेषेत
मे २३ - वृषभेत
जुलै ४ - मिथुनेत
ऑग्स्ट १८ - कर्केत
ऑक्टोबर ५ - सिहेत
नोव्हेंबर २६ - कन्येत

शनि -
 संपूर्ण वर्ष तूळेत
( २ नोव्हेंबर २०१४ रोजी वृश्चिकेत )