सर्वे भद्राणि पश्यन्तु मा
कश्चिद्दुःखभाग्भवेत् ॥
आरोग्य हीच खरी
सम्पत्ती आहे . वाढते प्रदूषण,
वारंवर उदभवणाऱ्या नवनव्या आजाराच्या
समस्या आजकाल
नेहमीच्या झाल्या आहेत. आहार
, मेडिकल विषयक आणि ज्योतिष
विषयक अनेक लेख
मी लिहिले. यावेळी
काही वेगळे आणि
साऱ्यांना सहज उपयोग
करून घेता येईल
अशा काही गोष्टी
लिहिण्याचा हा झकास
प्रयत्न ! आपली भारतीय
सौस्कृती अत्यंत सखोल , शास्त्रोक्त
आणि तितकीच भावपूर्ण
ही आहे. परंपरागत
चालत आलेल्या अनेक
शास्त्रांमध्ये अनेक उपयुक्त
टिप्स आपल्याला मिळतात.
आयुर्वेद , ऍलोपॅथी , आहारशास्त्र , होमिओपॅथी
, युनानी , नॅचरोपॅथी इत्यादी प्रस्थापित
आणि पारंपरिक शास्त्रांप्रमाणेच
ज्योतिष , वनस्पतीशास्त्र , फेंगशुई , वास्तू काही
इत्यादी अनेक गूढशास्त्राच्या
ब्रांचेस आपल्याला उपयुक्त अशा
अनेक गोष्टी आपल्या
पोटात दडवून आहेत.री , या
लेखांतून आरोग्यासाठी काही कॉम्बो-उपयुक्त टिप्स देण्याचा
प्रयत्न! थोतांडांपासून सावध राहून
आपल्या विचारात -आचारात काही
चांगल्या गोष्टी आणाव्यात आणि
त्याला तज्ञ वैद्यकीय
सल्ल्याची वेळप्रसंगी जोड असावी
हे महत्वाचे. अंधानुकरण
करून एखाद्या शात्राचा
फोलपणा ठरविण्यापेक्षा सत्यातले काही चांगले
घेता आले , तर त्याने
आपले आरोग्य अधिक
श्रेयस्कर , निरोगी आणि आनंदी
व्हावे यासाठीच हा प्रयत्न ! वैद्यकीय उपायांना
हा पर्याय नाही
! मात्र अनेकदा निरोगी राहणे
, रोगप्रतिकारक शक्ती वाढणे , औषधांचा
गूण सत्वर येणे
, मन आनंदी राहणे
अशा प्रकारे लवकर
बरे होण्यास या उपायांचा
निश्चित उपयोग होतो . तरी
, वेळप्रसंगी वैद्यकीय सल्ल्याची आणि
ह्या उपायांची सांगड
घातली तर उत्तमच
!
आवडल्यास ,
उपयुक्त ठरल्यास चोखंदळ वाचकांनी
जरूर कळविणे !
१. बिल्ववृक्ष आणि आरोग्य
:
भारतीय संस्कृतीत बेल किंवा
बिल्ववृक्षाला फार महत्व
आहे. प्रत्येक शुभकार्याच्या
प्रसंगी पूजनात बिल्व पत्रांचा
उपयोग केला जातो.
वैज्ञानिक दृष्टीकोन लक्षात घेऊनच
ही परंपरा सुरु
करण्यात आली. बिल्वपत्र
शिवलिंगावर वाहतांना बोटांच्या आणि
तळहाताच्या पृष्टभागावर, विषाणूंना मारक तत्व
आणि सुगंध पसरला
जातो. वेळोवेळी अंगाला
स्पर्श करण्यामुळे शरीरावर आक्रमण
करणारे विषाणू मरण पावतात
तसेच बिल्व सुगंधाने
पळून जातात. शेकडो
रोगांना नष्ट करण्याची
क्षमता असणाऱ्या ह्या दिव्य
वृक्षाची प्रजाती नष्ट होऊ
नये म्हणून, त्याला
पुजेतही स्थान देऊन त्याचे
अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न प्राचीन
काळापासून केला गेला.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील दाह
कमी करण्यासाठी क
त्रिम शरबत वापरणाऱ्या
फारच कमी लोकांना
माहित आहे कि,
बेलापासू बनलेले शरबत सर्व
दृष्टीने उपकारक आहे.
तांधळेपणा,
डोकेदुखी, डोक्यातील उ नाशक, रक्तातीसार,
पित्त अतिसार आदी
विकारांमध्ये विशेष गुणकारी आहे. क्षय,
बहिरेपणा, हृदयविकार, पोटाचे दुखणे,
अजीर्ण, आम्लपित्त, मंदाग्नी, संग्रहणी,
रक्तविकार, मधुमेह, जलोदर, त्वचाविकार,
वात ज्वर, कमजोरी,
अग्निदग्ध, व्रण गलगंड,
तृषाविकार इत्यादींवर देखील बिल्व
अतीव उपयुक्त आहे
. आयुर्वेदिक तज्ञांच्या सल्ल्यानेच उपचार
घेणे केव्हाही श्रेयस्कर
. भावप्रकाश, सुश्रुत साहिंता, भैषज्य
रत्नावली आदी आयुर्वेदिक
ग्रंथांमध्ये बेलाच्या उपयोगाबाबत खूप
लिहून ठेवलेले आहे.
उष्णताहरक, वात कफ
शामक, रेचक, दीपनकारी,
हृदयास उपकारक, स्तन्भक, शरीरातील
मुत्र व शर्करा
कमी करणारा आदी
महत्वपूर्ण गुणधर्म असलेला बेल
आयुर्वेदाचा महत्वपूर्ण झाड आहे.
बिल्व किंवा बेल वृक्षाचे
विविध भाषांमध्ये वेगवेगळी
नावे आहेत. कुळनाव-
Rutaceae लैटीननाव- Aegle
marmelos corr. इंग्रजी नाव- Bael Fruit Tree , Bael संस्कृत- बिल्व, शैलपत्र,
शिवेष्ट, पुतिवात, श्रीफळ मराठी-
बेल, बिल्व हिंदी-
बेल, विली, श्रीफल.
२. तुळस आणि
आरोग्य :
तुळस : तुळसतुळस
तुळस ही चवीस
तिखट, पचल्यानंतरही तिखट,
उष्ण, हलकी, कोरडी,
तीक्ष्ण, शरीरातील प्रत्येक कणापर्यंत
तात्काळ पोहोचणारी असते. तुळशीच्या
औषधासाठी विशेषतः रसाच्या रुपात
वापर करावयाचा असेल
तेव्हा ताजीच पाने वापरावीत
व ही पाने
तुळशीला मंजिर्या येण्याअगोदर
घ्यावीत. कारण मंजिर्या येण्याअगोदर
पानांमध्ये गुणांची तीव्रता अधिक
असते.
तुळशीचे बी तिच्या
मंजिर्यांमध्ये असते. मंजिर्या काळ्या
स्निग्ध, चमकदार होऊन आपोआप
गळायला लागतात. तेव्हा गोळा
कराव्यात. हे बीज
बल देणारे व
मूत्रप्रवृत्ती वाढविणारे असते.
ताप आल्यास तुळशीची ३०-४० पाने
व ३-४ काळी मिरी
४ तांबे पाण्यात
उकळून १ तांब्या
उरवून रात्री गरम
प्यायल्यास घाम येऊन
ताप उतरतो. उचकी
लागल्यास एक चमचा
तुळशीच्या रसात तेवढाच
मध घेऊन चाटल्यास
उचकी थांबते.
खोकल्यातून
कफ पडतांना त्रास
होत असल्यास दिवसातून
४-५ वेळा
एक-एक चमचा
तुळस रस घेतल्यास
कफ सुटतो. नायट्यासारख्या
रोगात व कीटक
दंशावर तुळशीचा पानांचा रस
उपयोगी पडतो. पोटामध्ये वायू
झाल्यास तुळशीचा रस तुपाबरोबर
घ्यावा. ज्यांना भूक लागत
नाही त्यांनी सकाळी
तुळशीचा एक चमचा
रस साखरेबरोबर घेतल्यास
सात दिवसांत फरक
जाणवतो.
3. वास्तू आणि आरोग्य
:
आरोग्यदायी
जीवनासाठी झोपताना पुर्वेला व
दक्षिणेला पाय करून
झोपु नये .
आपण कुठे व
कसे झोपतो यावर
आपले आरोग्य अवलंबुन
असते.उत्त्तम आरोग्यासाठी
उत्तर दिशेला पाय
करून झोपावे म्हणजे
आर्थिक,मानसिक,शारीरिक प्रगती
चांगली होते.
आजार बरे होत
नसतील तर झोपण्याची जागा
बदलून पाहा.
म्हणजे आजार लवकरात
लवकर बरा होईल.
बेड समोर आरसा
अथवा आरशाचे कपाट
येऊ देऊ नये.
त्यामुळे शरीरातील उर्जेची हानी
होते व आजार
वाढतात.
आरोग्यदायी
जीवनासाठी बॉक्स बेड वर
झोपू नये बॉक्स
बेड वर झोपणे
म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे
आहे.
घरामध्ये सुख-समृध्दीदायक
आयुष्यासाठी फुटलेले आरसे,फुटलेली
खेळणी,तुटलेले फर्निचर
इ .वस्तु ठेऊ
नये .
भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी
गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले
घडयाळ घरामध्ये ठेऊ
नये .
घरामध्ये असणारे टॉयलेट, बाथरूम,
ड्राय बाल्कनी याचे
दरवाजे कायम स्वरूपी
बंद ठेवावेत दरवाजे
उघडे ठेवल्यामुळे टॉयलेट,
बाथरूममधील
नकारात्मक ऊर्जा घरामध्ये पसरते
आणि प्रदूषित वातावरणामुळे
घरामध्ये सगळ्यांचे आरोग्य बिघडते
यामुळे टॉयलेट,
बाथरूम मध्ये कागदी कपामध्ये
खडे मीठ घालुन
ठेवणे व ते
दर पंधरा दिवसांनी
बदलणे आणि
टॉयलेट, बाथरूमच्या खिडक्या नेहमी
उघड्या ठेवणे.
सकाळच्या वेळेमध्ये आपल्या घरामधील
स्वयंपाक घर, बेडरूम,
हॉल यांची दारे
- खिडक्या सकाळच्या वेळेमध्ये उघड्या
ठेवाव्यात
त्यामुळे संध्याकाळ पासुन सकाळपर्यंत
म्हणजे १४ तास
घरामध्ये कोंडटलेली दुषित हवा,
अशुद्ध ऊर्जा ही घराच्या
बाहेर पडते व
घरामध्ये सकाळच्या वेळेमधील शुद्ध
हवेतील प्राणवायु, प्राणशक्ती आपल्याल्या
आणि आपल्या घराला
मिळते त्यामुळे
घरातील वातावरण शुद्ध राहते
आणि घरातील सर्वांचे
आरोग्य चांगले राहते त्यामुळे
सकाळच्या वेळेमध्ये घरातील
सर्व दारे
- खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
निरोगी आयुष्यासाठी वास्तू शास्त्राच्या
१० गुरुकिल्ल्या :
१) झोपताना पाय दक्षिणेला
किंवा पुर्वेला करू
नये उत्तरेला करावे.
२) घरामध्ये अडगळ भंगार,
बंद पडलेल्या वस्तु
ठेवु नयेत.
३) जुन्या चप्पल, शुज
फाटले तुटले असतील
तर फेकुन द्याव्यात.
४) फ्रीजचे तोंड दक्षिणेला
करू नये उत्तर
किंवा पुर्वेला करावे.
५) कोणतेही काम करताना
उत्तर किंवा पुर्वेला
तोंड करून काम
करावे.
६) पुर्व, उतर, ईशान्य
किंवा आग्नेयेला टॉयलेट
आले असेल तर
आरोग्य बिघडते यासाठी वास्तु
कन्सल्टिंग करून योग्य
उपाय करावे.
७) बेड खाली
अडगळ भंगार, मेटलच्या
वस्तु, भांडी, बंद पडलेले
पंखे, इस्त्री अशा
वस्तु ठेवु नयेत.
८) घरामध्ये भडक लाल
रंग, भडक काळा
व भडक निळा
असे रंग कोठेही
वापरू नयेत.
९) जेवायला बसताना जमिनीवर
बसुन जेवण करावे
आणि जेवण करताना
दक्षिणेला बसुन जेवणे
टाळावे.
१०) घरी शिजवलेले
अन्न जास्तीत जास्त
खावे बाहेरील जंक
फूड टाळावे आहारामध्ये
फळांचा वापर जास्त
करावा आणि फळे
आणल्यानंतर ते वायव्य
दिशेत ठेवावे.
4. ज्योतिष
शास्त्र आणि आरोग्य
:
ज्योतिष शास्त्रानुसार प्रथम स्थान , षष्ठ
स्थान , अष्टम स्थान , व्यय
स्थान बघून जातकाच्या
प्रकृतीचा अंदाज लावता येतो. कुंडलीतील
शुभ -अशुभ ग्रहांची
बैठक , या स्थानाचे
ग्रह , बिघडलेली रास , गोचरीच्या
ग्रहांचे भ्रमण , सध्याची दशा
-महादशा बघून अचूक
अंदाज बांधणे शक्य
होते. सखोल अभ्यासा
नंतर वैयक्तिक उपाय
सांगणे शक्य होते
. मात्र साऱ्यां साठीच ज्योतिष
शास्त्रानुसार फलदायी ठरणारे
निरोगी दीर्घायुष्यासाठी चे खालील
उपाय अवश्य करावेत.
१. विष्णू सहस्रनामाचा नियमित
पाठ करून एकादशीस
उपास करावा .
(डायबेटीस , हृदय विकार
, इतर विकार असणाऱ्यांनी
वैद्यकीय सल्ल्यानुसारच उपास करावा)
२. दुर्गा -कवचाचा पाठ
नियमित / अष्टमीस / नवरात्रात करावा
. उच्चार जमत नसल्यास
ह्या उपायांच्या नादी
न लागणेच श्रेयस्कर
!
३. पंचमुखी हनुमान / दक्षिण
- मुखी हनुमानास मंगळवार / बुधवार
/ शनिवारी नेमाने जावे. घरी
फोटो ठेवल्यास देवघरातच
ठेवावा.
४. रामरक्षेचा नित्य पाठ
करणाऱ्यास कसलेही भय / व्याधी
/ बाधा राहत नाहीत.
सायंकाळी अंगारा हातात धरून
पाठ म्हणावा. त्यानंतर
अंगारा आजारी व्यक्तीच्या / स्वतःच्या कपाळी लावावा.
५. पहाटे उठून स्नान
करणाऱ्यांनी सूर्यास अर्घय देऊन आदित्य
-हृदय स्तोत्राचा पाठ
केल्यास निश्चित तब्बेतीत
प्रगती जाणवते !
No comments:
Post a Comment
Your Queries / Suggestions most welcome!