उचलेगीरीस सक्त मनाई

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Monday, December 19, 2016

शनी महाराज : धनु राशीत ४ वर्षे मुक्कामास ! 2017-2018-2019-2020

शनी महाराज : धनु राशीत ४ वर्षे मुक्कामास !


या  लेखात २०१७ च्या धनु राशीत जाणाऱ्या शनीची राशीनुसार मिळणारी फळे लिहीत आहे. वक्री होऊन मागील स्थानात येणारा शनी आपल्या लीला दाखवेलच. मात्र साधारणपणे धनु राशीतील शनी आणि त्याची फळे लिहिली आहेत.
Shani Transit 2017-2018-2019-2020 vrushchik to dhanu rashi

सर्वसाधारण मोघम सार :

वृश्चिकेतील शनी पेक्षा धनु राशीतील शनी साऱ्यांनाच सुटकेचा निश्वास आहे ! धनु राशीतील शनी केतू , शुक्र आणि रवीच्या नक्षत्रांतून भ्रमण करेल. मूळ नक्षत्रातील केतूच्या अंमलात असणारे शनीचे भ्रमण काहीसे कुरकुरे जाईल. २६ जानेवारी २०१७ ते २ मार्च २०१८ या काळात हे भ्रमण असेल.( २ मार्च २०१८ नंतरचा  पुढचा काळ साधारण साऱ्यांना परिस्थितीत सुदाहरणा दिसण्याचा !)इथेच २१ जून २०१७ ते २६ ऑकटोबर २०१७ ह्या ५ महिन्यात शनी वक्री होऊन पुन्हा वृश्चिकेचा डंख मारून इंगा दाखवणार आहे. शनी महाराज चौकार -षटकार मारीत तब्बल ४ वर्षे (सरळ / वक्री वगरे ) धनु राशीत मुक्कामास आहेत. २५ जानेवारी २०२० रोजी महापर्वणी च जणू , की वैश्विक ऊर्जेच्या जगातील हे महान खेळाडू अखेरीस आपल्या स्वतःच्या " मकर " राशीत  प्रवेश करतील.

शनिमहाराजांची ४ वर्षे प्रवासगाथा :


२६ जानेवारी २०१७ : वृश्चिकेतून धनु राशीत
७ एप्रिल २०१७  : धनु राशीत वक्री
२१ जून २०१७ : वक्री शनी वृश्चिकेत दाखल ! हल्लाबोल !
२७ ऑकटोबर २०१७: वृश्चिकेतून धनु राशीत  पुन्हा आगमन
१९ एप्रिल २०१८ : धनु राशीत वक्री
६ सप्टेंबर २०१८ : धनु राशीत सरळ ( मार्गी )
१ मे २०१९: धनु राशीत वक्री
१९ सप्टेंबर २०१९ : धनु राशीत सरळ (मार्गी )
२५ जानेवरी २०२० : मकर राशीत प्रवेश ! ( साष्टांग धप्प !!! मकरेत - झेंडा रोविला !!! हुश्शह्ह !!!)

२६ जानेवारी २०१७ ते २ मार्च २०१८ : मूळ नक्षत्रात भ्रमण
२ मार्च २०१८ ते २७ डिसेम्बर २०१९ : पूर्वाषाढा नक्षत्रात भ्रमण


विशेष राशी :

अष्टम शनी : वृषभ राशीस धनु राशीतील शनी अष्टम असेल.
कंटक शनी : ४, ७, १० वा शनी मिथुन , कन्या , मीन राशीस असेल. (केंद्रातून शनी चे भ्रमण कंटक शनी म्हणले जाते.)