उचलेगीरीस सक्त मनाई

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Monday, July 13, 2020

काळ भैरव उपासना - सर्व दुःख विनाशक



काळ भैरव कोण आहेत ?

शंकराचे काशी आणि उज्जैन स्थित उग्र रूप म्हणजे कालभैरव. कालभैरवाची अनेक रूपे आहेत.
भैरवांच्या ह्या 8 नावांचे उच्चारण मनोवांछित मनोकामना पूर्ण करते.

1-अतिसांग भैरव
2-चंड भैरव
3-रुरु भैरव
4-क्रोध भैरव
5-उन्मत्त भैरव
6-कपाल भैरव
7-संहार भैरव
8-भीषण भैरव


भैरव ह्या ३ रूपांमध्ये विशेष पूजिले जातात. बटुक भैरव, महाकाल भैरव आणि स्वर्णाकर्षण भैरव .कालभैरव अष्टमीच्या दिवशी भैरवाची विशेष पूजा उपासना फलदायी ठरते. तांत्रिक सिद्धिंसाठी जरी ह्यांची उपासना होत असली , तरी सामान्य सांसारिक माणसाने सर्व शत्रू विनाशासाठी, जन्मोजन्मीची कर्म मिटावीत म्हणून , सर्व तऱ्हेच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी त्यांची उपासना अवश्य करावी.

कोणाला विशेष फलदायी ठरेल कालभैरव उपासना :


खालील गोष्टींसाठी कालभैरवाचे आवाहन सर्व समस्यांचा विनाश करते. शंकराचे उग्र रूप असल्याने ते शत्रू विनाश , सुरक्षा करते- अधिक तीव्रतेने.
सर्व शंकर भक्त ह्यांना विशेष फलदायी
शनी , राहू , मंगळ ग्रहांविषयी कोणतेही पत्रिका दोष
कोणत्याही संकट प्रसंगी
अडलेली कामे होण्यासाठी
संतती विषयक आनंद वृद्धीसाठी

कालभैरव उपासनेची साधी प्रभावी स्तोत्रे आणि मंत्र 


१. कालभैरवाष्टकम - अत्यंत लयबद्ध , गोड ऐकायला असणारे , अत्यंत प्रभावी असे हे स्तोत्र.
२. अडलेली कामे त्वरेने होण्यासाठी - ओम ब्रह्म काल भैरवाय फट
३. संततीस कोणतीही पीडा , त्रास असल्यास - ओम भयहरणं च भैरव:

अनेकांना २४ तासांत सत्वर फळ मिळते. फळ मिळणे न मिळणे प्रत्येक भक्ताच्या देवावरील प्रेमावर , श्रद्धेवर आणि जन्मोजन्मीची कर्मांवर अवलंबून असते.
मनोभावे प्रार्थना केल्यास मार्ग दिसतो. 

No comments:

Post a Comment

Your Queries / Suggestions most welcome!